पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असाही दोस्ताना

असाही दोस्ताना ....... “ जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright……” असं म्हणत नाचणाऱ्या जॉन अभिषेक आणि प्रियांका ऐवजी अक्षताला ती आणि गायत्रीने सेंड ऑफला केलेला भन्नाट डान्स आठवून हसू येत होत आणि हसता हसता नकळत तिच्या डोळ्यात गायत्रीच्या आठवणीने पाणी आलं. तेवढ्यात “ आई, किती वाईट आहे ग आराध्या!!” असं म्हणत अक्षताच्या लेकीने घरात एन्ट्री केली. लाडक्या लेकीचं आज काहीतरी बिनसलंय हे अक्षताच्या लक्षात आलं. हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत ती अंशिकाच्या जवळ गेली. गोबरे गोबरे गाल लाल झाले होते आणि डोळ्यात कितीतरी मोत्यांची गर्दी झाली होती. अक्षताने डोक्यावरून हात फिरवताच सगळे मोती सांडू लागले. अक्षतानेही मग आधी तिचं रडणं संपू दिलं आणि शांत झाल्यावर तिला विचारलं, “काय झाल पिल्लू?” तसं अंशिकाने सांगितलं कि ती नव्हती दोन दिवस स्कूलमध्ये. त्याचवेळेस सगळ्यांचे प्रोजेक्ट कळाले मग आराध्याला दुसरी मुलगी पार्टनर म्हणून मिळाली, मग हिला राग आला आणि ती बोलली तिला काहीतरी. त्यावरून आराध्याला पण राग आला सो अघोषित अबोला चालू झाला आणि त्याचमुळे आज चिडचिड सुरु होती. लेकीची समजूत घालून अक्षताने ति