पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असं जमलं आमचं

#असं जमलं आमचं       पुणे- नाशिक- पुणे    ती आपली टॉमबॉय भरपूर मित्रमैत्रिणी जमवून गोंधळ करणारी, तो मात्र मुलींशी कसं बोलू यात अडकलेला. त्याचे जेंव्हा कांद्यापोह्याचे कार्यक्रम सुरू होते तेव्हा ती मात्र मस्तपैकी कॉलेजमध्ये धिंगाणा करण्यात बिझी होती. अशातच तिच्या चुलत बहिणीला बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि तो मुलीला बघण्यासाठी हिच्या घरी आला. हीच दोघांची पहिली भेट.            त्याला बघितल्यावर तिची रिएक्शन की काय ध्यान आहे आणि त्याची तिच्याबद्दल प्रतिक्रिया किती गबाळी आहे ही😝ही पृथ्वीवर शेवटची मुलगी असेल तरी मी हिच्याशी लग्न नाही करणार( खरतर तो तिच्या बहिणीला बघायला आला होता आणि मनात हे 😝😝). पुढे ते लग्न जमलं नाही पण या दोघांची मात्र मस्त मैत्री झाली. तिचा स्वभाव बडबडा असल्याने तिने त्याला ही बोलण्यास भाग पाडलंच. आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर दोघेही प्रचंड हसत सुटले. एकीकडे तो त्याचं MBA  आणि नोकरी ह्यात बिझी होता आणि दुसरीकडे त्याचे कांदेपोहे पण चालूच होते . तिचं तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं आणि सोबत तो मुली बघून आला की त्यावरून त्याला चिडवणे.             तिचं क