पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शुद्ध बिजापोटी....

#शुद्ध_बिजापोटी... नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली एका राजाची आणि चंदनाच्या व्यापाऱ्याची. व्यापारी त्याचा धंदा होत नसतो म्हणून राजाच्या मरणाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे होतं काय राजाच्या मनातही त्याला न बघता , न भेटता फाशीवर लटकवायचा विचार येऊ लागतो. गोष्टीचं तात्पर्य अस होतं की आपण मनात ज्या व्यक्तीबद्दल , जसे विचार करत असतो तशीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून नकळत आपल्याला दिली जाते. कारण आपल्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल विष किंवा साखर पेरण्याचं काम करत असतात. पेरलेले उगवतेच फक्त ते आपल्या फायद्याचे ठरते की नाही हे वेळ ठरवते. सरिता ला सुद्धा अशीच सवय होती.कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं अस ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होतं. त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव, नवीन लोक म्हटलं की सरीताच सुरू झालं नेहमीप्रमाणे. नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस. पण ऐक