पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना

इमेज
#स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना #माझा_प्रवास  #गौरीहर्षल गेल्या काही दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.   ह्याच विचारातून #स्वतःसाठी_बदलताना काय करावं लागेल  ती यादी तयार करायला सुरुवात केली.  आणि काय सांगू खूप काही सापडलं जे मला सतत जाणवून देत राहील की                    "तुझे आहे तुजपाशी,                   परि तू जागा चुकलासी"   मग काय म्हटलं हेही लिहून ठेवूया. कद

विषारी सकारात्मकता - गौरीहर्षल

इमेज
#विषारी_सकारात्मकता #toxic_positivity टायटल बरोबरच आहे. आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कोरोना आपल्या आयुष्यात आला आणि त्याने गेल्या काही महिन्यात यथेच्छ धुमाकूळ घालत आपल्या आयुष्यात नको तितके बदल घडवून आणले. त्यातले काही बदल अर्थातच चांगले आहेत तर काही नाहीत. पण ह्या सगळ्यात ज्या गोष्टीचा गवगवा सोशल मीडियावर जास्त झाला ते म्हणजे सकारात्मकता किंवा positivity.  जो तो उठला आणि सांगत सुटला की आपण आलेल्या परिस्थितीत सकारात्मक विचार करत कसं जगायला हवं. पण म्हणतात नं अति तिथे माती तसंच काहीसं ह्या सकारात्मकतेच्या दृष्टिकोनाचंही झालंय. आणि त्यातून आता हे नवीन पिल्लू बाहेर पडले आहे ज्याचं नाव आहे  #विषारी_सकारात्मकता अर्थात #toxic_positivity. आता प्रश्न आहे की सकारात्मकता सुद्धा घातक ठरू शकते का? तर हो. कशी? टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे ते आधी बघू.  टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी,अवघड प्रसंग आले तरीही त्यामुळे होणारा त्रास लपवत सतत आनंदी किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे.  आता कुणी म्हणेल ह्यात काय चुकीचं आहे? तर आनंदी,सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे ह्

फिरुनी नवी जन्मेन मी

इमेज
नव्यानेच उमलणारी लाजरी, हसरी , नाचरी बाहुली होती ती.  नुकतेच स्वप्नांच्या पावलांनी १६व्या वर्षात पाऊल टाकले होते.     शाळेचे धरलेले बोट सुटून सुटली कॉलेजच्या हातात हात दिला होता. जसे जसे नवे विश्व खुणावत होते तसे तिचे पंख भरारी मारण्यासाठी उत्सुक झाले होते.    अशातच एक दिवस बाबांनी हातात नव्याकोऱ्या स्कुटीची चावी टेकवली. आतातर काय आभाळ ठेंगणे झाले. उत्साहाने आवडीच्या सगळ्या ठिकाणी ती गाडीवर भटकून आली.     गाडीच्या वाढलेल्या वेगासोबत मैत्री करताना शरीर देत असलेली सूचना मात्र तिने धुडकावून लावली. आणि अचानक साध्या सरळ मार्गाने निघालेल्या तिच्या आयुष्याला ब्रेक मिळाला. निमित्त झालं एका छोट्या अपघाताचं. डोक्यावर पडल्याने सुरक्षितता म्हणून काही चाचण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या.  निदान - ब्रेन ट्युमर, प्राथमिक सुरुवात होती पण ट्युमर म्हणजे ऑपरेशन.  जवळचे सगळे हवालदिल झालेले. ही मात्र तशी शांत होती. लवकरात लवकर ऑपरेशन केले तर फायदेशीर ठरेल असे डॉक्टर सांगत होते. हो, नाही करत तिने सगळ्यांना तयार केले. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली पुढच्याच आठवड्यातली.  तारीख बघताच तिच्या आईवडिलांचे उसने अव

जरा विसावू या वळणावर....

इमेज
"भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर" ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले. कसे कोठुनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो उगाच रुसतो क्षणात आतुर क्षणात कातर लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले. माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन

कितीदा नव्याने

इमेज
"कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे" गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही.  नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.  ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली.  अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला.  आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.  शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती न

अंतरंगातला देव

इमेज
गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला.  तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला.  पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो  करत असे.  आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील.  अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा.  आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले.  "काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला.  पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या.  हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू

लग जा गले

इमेज
लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो तिच्या आवाजातली व्याकुळता तो आपल्या मनात नकळतच साठवून ठेवण्याची धडपड करत होता. ड्युटी पुन्हा जॉईन करा असा तडकाफडकी निरोप आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी तिचा चेहरा आला होता. दोनच दिवसांनी असणारा त्याचा वाढदिवस ह्यावेळी तरी एकत्र साजरा करता येईल म्हणून किती प्लॅन करत होती ती. काही त्याला सांगून तर काही लपून छपून. पण आता मात्र ते शक्य नव्हतं.  शेवटी मनाचा हिय्या करत त्याने तिला सांगितलंच. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती त्याला म्हणाली, "बरं झालं माझी सगळी तयारी झाली होती ते. तुझे सगळे गिफ्ट्स तरी तुला प्रत्यक्ष देता येतील. आणि तुला अजून काही हवं असेल तर ते ही आणता येईल. उद्या दुपारी जाणार न तू?" तिचं वागणं बघून तो थक्क झाला होता. आपल्याला कस कळलं नाही कधी एवढी स्ट्रॉंग झाली ही? सायन्सच्या प्रॅक्टिकलला डिसेक्शन करताना घाबरलेली ती आणि आत्ताची ही केवढा फरक पडला.  ते काहीही असलं तरी मी मात्र अजूनच प्रेमात पडतोय हिच्या. माझ्यास

मला आवडलेलं पुस्तक भाग १

इमेज
#मला_आवडलेलं_पुस्तक जिवात्म जगाचे कायदे / laws of spiritual world  लेखिका - खोरशीद भावनगरी मागच्या वर्षी एका ग्रुपवर अशीच पुस्तकावर चर्चा सुरू होती तिथे ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कुणाला आवडले होते कुणाला नाही.  चर्चा वाचून शेवटी पुस्तक मागवलं. हे पुस्तक मात्र नेहमीप्रमाणे एका बैठकीत वाचून संपवलं नाही. निवांत वेळ काढत एकेक प्रकरण वाचलं. आणि मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली.  पुस्तक लिहिले आहे खोरशीद भावनगरी ह्यांनी. पुस्तकाच्या नावावरून विषयाचा अंदाज येतोच पण तरीही सांगते. हे पुस्तक हा त्यांच्या दोन दिवंगत मुलांच्या आत्म्यांशी असलेला संवाद आहे. असा संवाद जो व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील बऱ्याच सवयी, पद्धती ह्यांच्यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो.  पुस्तक कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही कारण तसं काहीच ह्या पुस्तकात नाही. ह्या आत्म्यांशी संवाद हा विशिष्ट पद्धतीने साधला गेला आहे. त्या पद्धतीही त्याचं उत्तम ज्ञान घेऊनच वापरल्या आहेत. (Planchet वगैरे फालतू प्रकार नाहीत? ) मला हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे एक तर वयाच्या मानाने बऱ्यापैकी लवकर ते माझ्या हातात पडले आहे. आणि

रंजीश ही सही🎶🎶 भाग १

इमेज
रंजीश ही सही 🎶🎶 भाग १  आपल्या छोटयाशा घरात असणाऱ्या मोठ्या खिडकीत टांगलेल्या झोपाळ्यावर झोके ती बाहेर कोसळणारा पाऊस बघत होती.  मागे बॅकग्राऊंडला रुना लैलाच्या आवाजात तिची आवडती गझल बरसत होती अगदी रिपीट मोडवर.  (Lyrics By: अहमद फ़राज़) रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ रंजिश ही सही... इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ रंजिश ही सही... कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ रंजिश ही सही... माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ रंजिश ही सही... जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ रंजिश ही सही... पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ रंजिश ही सही... किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ रंजिश ही सही... एका क्षणी तिला मनावरचा भार इतका नकोसा झाला की मेंदूचं न ऐकत

ट्विस्ट अँड टर्न

इमेज
#ट्विस्ट_अँड_टर्न  सिरियल्सना कितीही नाव ठेवली तरी आपण सगळे सिरियल्स, डेली सोप बघतो. त्यात रमतो, कुणी चेष्टा करण्यासाठी बघतात तर काही जण आपापल्या दुःखाना विसरण्यासाठी बघतात. पण इथे तो विषयच नाहीये.  इथे सिरियलच्या गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे बघा ना सगळ्या सिरियलमध्ये त्या हिरो हिरोईनला इतर पात्रांना दोन ते तीन वेळा चान्स मिळतो नव्याने आयुष्य सुरू करण्याचा. आणि तेही मेक ओव्हर सहित. बऱ्याच जणांना हे बघायलाच जास्त आवडतं. कारण खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही न.  पण सध्या घडतंय की , आपल्या सगळ्यांचं आयुष्य स्थिर झालं आहे एका ठिकाणी येऊन कुणीही पुढे जात नाहीये कुणीही मागे रहात नाहीये.  सगळे फक्त जगण्याची उमेद धरून ठेवण्याची धडपड करत आहेत.  प्रत्येक जण आपापल्या परीने कसल्या न कसल्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करतोय. ह्यात कधी कधी चिडचिड होतेय भांडणं, वादही होताहेत. पण ते सगळं बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेताना होणारच.    असो तर आपण बोलत होतो सिरियलसारख्या खऱ्या आयुष्यात आलेल्या ट्विस्ट आणि टर्न बद्दल.  हा ट्विस्ट सध्या भरपूर बदल घडवतोय.  काही गोष्टी काही माणसं नव्याने भेटत आहेत

जिंदगी धूप तुम घना साया

इमेज
#जिंदगी_धूप_तुम_घना_साया तसे ते दोघेही कानसेन सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचं मग त्यातल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्याही गाण्यांवर चर्चा करायची. हा दोघांचा आवडता छंद सोबतीला चहा असायचाच कधी वाफाळणारा तर कधी iced टी सुद्धा पण ते मुडवर अवलंबून असे.  आताशा दोघेही व्यापातून निवांत झाले होते. पिल्लं अजून घरट्यातून उडाली नव्हती,पण आता त्यांची विश्व निर्माण झाली होती. त्यामुळेच ह्या दोघांना स्वतःला आणि एकमेकांना देण्यासाठी हवा तसा अन् तेवढा वेळ काढता येत होता. ते ही धडपड करतच होते कारण इतक्या वर्षांच्या काळात त्यांना एकमेकांना दिलेलं पहिलं वचन निभवायचं होतं. कोणत? मनापासून जगण्याचा आनंद घेण्याचं.  लग्नाआधी जेव्हा ते एकदाच एकमेकांना भेटले होते तेंव्हाही दोघांची चर्चा गाण्यावरच झाली होती. ते भेटले त्या हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जगजितच्या गझल सुरू होत्या. हॉटेल मालकच फॅन होता वाटतं कारण एकसे एक गझल , गाणी कानावर पडत होती.  त्यातच तुमको देखा तो ये खयाल आया सुरू झालं आणि एकाचवेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मनाची मनाला खूण पटली आणि अवघडलेपण गळून पडले.  "मला हे गाणं प्रचंड आवडतं" दोघेही एकत्रच बो

ख्वाहिशे

कभी दबे पाँव जो मिलने आती है , कोई देख न ले जाते हुए इसलिए  चुपकेसे चली जाती है ख्वाहिशें। समझदारी ने कंधोपे जो बोझ रख दिया है  वो देखके जाते जाते  हल्केसे मुस्कुराती है ख्वाहिशें। हमारी मुलाकात में  मुझे मिल जाता है सुकून न जाने कैसा, हलका हलका लगने लगता है उतरा हो कोई कर्ज जैसा। ५.३.२०२० #गौरीहर्षल

समांतर

दोन समांतर रेषा आहोत आपण एकाच दिशेने जाणाऱ्या पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती  वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या माझ्या वाटेवर आहेत सावल्या मुखवट्या मागे लपणाऱ्या तुला झाली आहे सवय  खोट्यालाही  खर मानून जगण्याची मला अजूनही आहे जुनीच खोड  खऱ्यालाही पारखून घेण्याची चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या तर हसतो आपण सवयीने पण तुला आणि मला ही माहिती आहे कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला  नियतीने समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत 26.2.2020

गीतसप्तक भाग ५

#गीतसप्तक मन धागा धागा मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं  प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय.  १.        असे कसे बोलायचे न बोलता आता        तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता        डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता        सांगा जरा असे कसे लपायचे रे आता          मन धागा धागा जोडते नवा           मन धागा धागा रेशमी दुवा   तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं..... २.               एकटी मी दिनरात तरीही तू भोवती                हातात नाही हात तरीही तू सोबती                      मन बेभान बेभान

गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक कितीक् हळवे, कितीक् सुंदर,  किती शहाणे आपूले अंतर हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो. आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित.  पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तस

गीतसप्तक भाग ३

इमेज
#गीतसप्तक असावा सुंदर चॉकलेटचा बंगला 'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष.  प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो.  लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग

गीतसप्तक भाग २

इमेज
#गीतसप्तक भाग २ बस इतना सा ख्वाब है  जो भी चाहूँ वो मैं पाऊँ जिंदगी में जीत जाऊं चाँद तारे तोड़ लाऊं सारी दुनिया पर मैं छाऊँ बस इतना सा ख्वाब है   आपल्याला कळतही नसतं तेंव्हापासून  आपण स्वप्नं बघत असतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा. त्या कधी आपण उघड उघड सांगतो कधी नाही सांगत. पण हे गाणं मात्र प्रत्येकाच्याच मनात कधी न कधी येणाऱ्या इच्छा सांगतं. मलातरी आवडतं स्वप्नं बघायला काही क्षणांसाठी का होईना त्या जगात हरवून जायला.  अर्थात एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच तिची ओढ असते. यावरून अजून एका गाण्याची ओळ आठवली, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा. एखादं गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जितकी जिवापाड मेहनत करतो तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो ती गोष्ट मिळाल्यावर. तरीही स्वप्न पाहणं हे कायमच आवडत कारण स्वप्न एक आशा सतत जागी ठेवतात मनात की मिळेल 'कष्टाचं फळ' आज न उद्या नक्कीच मिळेल. पण इथे मात्र त्या गाण्यातील हिरोला सगळं हवं असतं. अगदी चंद्र, ताऱ्यांपासून ते ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक सगळंच. झटपट असं सगळं मिळवण्याचा त

बिती हुई बतीयां

इमेज
#बीती_हुई_बतियाँ                     बीती हुई बतियाँ कोई दोहराये,                    भूले हुए नामों से कोई तो बुलाये ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.  लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं  कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.   माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला. जुनी ख

टेक अ चान्स

इमेज
#टेक_अ_चान्स "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "         स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं  हे वाक्य  सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं.        सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी  उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस.मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना , घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं.         आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं?  खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा  वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता

चले आओ

चले आओ इक बार फिर  उसी मोड़ पर  जहाँ कभी सूरज डूबा था हमें देखते हुए चले आओ इक बार फिर  उसी मोड़ पर जहाँ हमारी हँसी सुनकर  माहौल खुश हुआ करता था चले आओ इक बार फिर  उसी मोड़ पर क्योंकि आज भी वो मोड़  तुम्हारी याद लिए यूँही बैठा है खुश होनेकी चाह में आज भी सूरज  हमारे चेहरे की वो रोशनी ढूँढता है फिरसे आनेकी चाह में उम्र छीन ले गयी वो मासूमियत पर  दिल अभीभी वहीं है फिरसे जीने की चाह में चले आओ बस..... #गौरीहर्षल #१९.१०.२०१९

उधार का इतवार

उधार का इतवार इतवार  उधार का  लगता है आजकल पूछूँ मिले तो कहा है मेरे वो अपने पल अजनबी रास्तो और गलियों में अपना कोई मिलता नहीं क्या करें अपनोकी गलीसे आजकल मैं भी तो गुजरता नहीं दरवाजे पर दस्तक मेरे नाम की तो होती है पर खोलने के बाद मुलाकात काम से ही होती है बचपन का इतवार लाता था मस्ती के साथ सुकूनभरे पल आज का इतवार स्क्रीन के साथ ही होता है आंखोंसे ओझल किसी को मिले अगर सुकूनभरा वो इतवार मिलवाना जरूर, मुझे भी है उसका इंतजार #गौरीहर्षल ६.१.२०२०

सामान्य

खरच छान आहे सामान्य असणं सगळं जगच आपलं आहे असं वाटणं हसणं, रुसणं, बोलणं , वागणं असूनही नसणं, नसूनही असणं कुणाला तरी आठवणीत आठवण कुणाच्या तरी आठवणीत रेंगाळण स्वप्नांचे इमले बांधत राहणं पूर्ण होवो न होवो सतत स्वप्न बघत राहणं त्यात रमूनही वास्तवात जगणं खरच छान आहे सामान्य असणं असंच रहावं सगळं साधंच स्वप्नांच्या दारावर सतत तोरण आशेच वास्तवात न मिळणारी सुखं शोधण्यासाठी बळ मिळत राहावं प्रकाशाचं 9.1.2020 #गौरीहर्षल

सुखाची व्याख्या

सुखाची व्याख्या असते प्रत्येकाची वेगळी भौतिक, आत्मिक आणि निरनिराळी कुणीतरी आनंदी असतं आनंदाच्या कल्पनेत कुणालातरी सुख गवसतं पैश्याच्या दुनियेत सुखाच्या शोधात सगळे धडपडत असतात त्यातले किती जण स्वतःला सापडतात?? दुसऱ्याला आनंदात बघतात आणि होतात दुःखी असे कसे हे जीव इतरांवर जळून होतील सुखी?? मनापासून सुखात साद हल्ली कुणी घालत नाही दुःखात मात्र इतरांच्या सोबतीची हवी ग्वाही सुख म्हणजे काय असतं?  हाती न लागणारं मृगजळ सुख म्हणजे काय असतं? हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावपळ सुख म्हणजे काय असत?  कुणालाही अजूनही सापडलं नाही तरी त्याच्या मागे आयुष्य खर्ची करणं  माणसाने सोडलं नाही. सुख असतं समाधानाने जगण्यात, आपल्यासोबत इतरांना सुखी असुदे म्हणण्यात. सुख असत लहान मुलांच्या निरागस हसण्यात,  नको नको म्हणताना मायेने भरवलेल्या घासात. सुख असत आपल्या माणसाच्या सहवासात, कसलीही जाहिरात न करता घालवलेल्या क्षणात. सुख असत आपल्याच हातात, मनात आणि विचारात, छोटया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात.  लिस्ट तशी मोठी सुख सापडणाऱ्या जागांची  पण  प्रत्येकाची वेगळी असते न व्याख्या सुखाची...... #गौरीहर्षल ४.१.२०२०