पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मॉर्निंग मंत्रा १

इमेज
#मॉर्निंग_मंत्रा १  १९ ऑक्टोबर २०२२ #थॉट्स_पॅटर्न (स्विकार आणि बदल)  Acceptance म्हणजे स्विकारणं.  आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण नाईलाजाने स्विकारतो.  पण काही गोष्टी मात्र खरोखरच स्विकारण्याची गरज असते.  जसं की,  - स्वतःला आहे तसं स्विकारणं  - आपल्यामध्ये असलेले दुर्गुण स्विकारणं  - आपल्याला एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, घटनेचा त्रास होतो हे स्विकारणं.  - आपणही चुकू शकतो, चुकलो आहोत, चुकतो आहोत हे स्विकारणे आपली बऱ्याच परिस्थितीत प्रतिक्रिया काय असते माहीत आहे? मला नाही करायचं हे, लोक काय म्हणतील? , मला जमणार आहे का असलं काही? म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला पलायन करायचे असते.  पळायचे मग ती एखादी समस्या असो किंवा आलेली संधी.  पण पळून प्रश्न सुटतात का? विचारा.... स्वतःला विचारा की बाबारे आत्तापर्यंत मी कितीतरी वेळा कितीतरी गोष्टींपासून, माणसांपासून , समस्यांपासून, संधींपासून पळालो आहे तर त्यामुळे माझे प्रश्न सुटले की अजून गुंतागुंतीचे झाले?  जर उत्तर सुटले अस असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत🙏 ग्रेट आहात तुम्ही.  पण जर गुंतागुंत वाढली असेल तर ती सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? की नेहमी

दुर्गे दुर्घट भारी भाग 2

इमेज
#दुर्गे_दुर्घट_भारी भाग २  आय नो मंडळी बरेच दिवस गॅप घेऊन भाग येतात. पण काय करू जुन्या गोष्टी आठवून त्यातून मोजकंच आणि महत्वाचं तुमच्यासमोर मांडायचं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा सगळं रिकॉल करावं लागतं.  तर आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो ते २०१८ गुढीपाडवा ह्या दिवसापर्यंत.  मार्च २०१८ च्या गुढीपाडव्याला आम्हाला पुन्हा एकदा कळलं की आम्ही आईबाबा होणार आहोत. पण ह्यावेळेस चार महिने थांबून मग पुन्हा हुलकावणी ह्या चक्रातून जाण्याची आमच्या दोघांची तयारी नव्हती. कारण नुकत्याच जानेवारीच्या सुरुवातीला माझ्या सासूबाई आकस्मिकपणे आम्हाला सोडून गेल्या होत्या. त्यातून पुन्हा हे सगळं म्हटल्यावर मी तर अक्षरशः डॉक्टराना कन्फर्म होत नसेल तर लगेच सांगा म्हणून मोकळी झाले.  पण ह्यावेळेस बऱ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या. बातमी कळली गुढीपाडव्याला आणि त्यानंतर मला ज्या ज्या दिवशी चेकअप साठी बोलावलं होत त्या प्रत्येक दिवशी काही तरी विशेष असायचं.  म्हणजे पुढचं चेकअप झालं रामनवमीला तेंव्हा डॉक्टर स्वतः होपफुल होते. पण अर्थातच त्यांनी माझी अवस्था पाहून काही खोटी आशा दाखवली नव्हती.  आणि माझी हो नाही करता करता शेवटी

दुर्गे दुर्घट भारी भाग १

इमेज
#दुर्गे_दुर्घट_भारी १ काही गोष्टी घडून येण्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागते. काही गोष्टी आपोआपच योग्य वेळी घडून येतात.  पण अनुभूती मात्र तुमच्या तयार होण्याची वाट बघत असते. कारण जोपर्यंत ते अनुभव त्यांची ताकद पेलण्यास तुम्ही मानसिक पातळीवर तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचा आवाका कळण्याची सुतराम शक्यता नसते.  वेगळी वाट जेव्हा आपल्यासाठी तयार केली जात असते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. स्वतःला आणि जवळच्या लोकांना अगणित शारीरिक यातना , मानसिक पातळीवर उलथापालथ, आजूबाजूला ज्यांच्यावर आपला अतिविश्वास असतो अशा कित्येकांचे खरे रूप समोर येते. कित्येकदा आपण कोलमडून पडतो. असे आणि ह्यापेक्षा विचित्र असे कित्येक प्रसंग तुमच्यासोबत घडतात.  आता कुणी म्हणतील अस का? तर त्याचं उत्तर एकच आयुष्यात पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्या पातळींवर सक्षम करणे. कुठलाही आणि कसलाही प्रसंग आला तरी तुम्ही न डगमगता त्या गोष्टींचा सामना करावा म्हणून हा सगळा प्रपंच.  बऱ्याच जणांना वाटत असते अरे वा ह्याचं बरंय ह्यांना अध्यात्मिक अनुभव येतात, देव ह्य

दुर्गे दुर्घट भारी

इमेज
#दुर्गे_दुर्घट_भारी  #विश्वास एवढीशी कथा 15 भागात संपवून टाकू म्हणून सुरू केली होती. पण तिने आत्तापर्यंत 72 भाग घेतले.  मानगुटीवर बसून लिहून घेणं काय असतं ते मला विश्वास मुळे कळलं. 5 मिनिटे एका जागी स्वस्थ न बसणारी मी आता एक तास सहज तंद्री लागल्यासारखी बसलेली असते.  स्वतःला शोधताना ह्या माझ्या फेसबुक पेज आणि ब्लॉगच नाव ह्या कथेने खरं केलं. आत्तापर्यंतच्या 35 वर्षाच्या छोट्याश्या संपुर्ण आयुष्यात मिळाले नसते एवढे अनुभव जून 2021 ते सप्टेंबर 2022 ह्या वर्षात मिळाले.  अतर्क्य अनुभव त्यांची व्याप्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सतत होऊ लागली. पण आपल्या एवढ्याशा अस्तित्वाची त्यांनी दखल घेतली आहे हे लक्षात आल्यावर अंगावर काटा आला.  माणसांनी माणसावर जबाबदारी टाकणे आणि त्या वर बसलेल्या शक्तीने आपल्यावर जबाबदारीची कामे देणे ह्यामध्ये किती फरक आहे हे कळत गेलं.  खूप गोष्टी, व्यक्ती ह्या प्रोसेसमध्ये दुरावल्या ह्याचं कारण मला जस समजलं त्याप्रमाणे तरी चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करणं हेच आहे.  हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे माझ्यासाठी सुद्धा. पण प्रय