पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुर्गे दुर्घट भारी भाग 3

इमेज
#दुर्गे_दुर्घट_भारी भाग ३  ध्यानाला बसायचं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक अवघड काम असत. पण माझ्या लेकाने पोटात असल्यापासून ही गोष्ट माझ्याकडून करून घेतली.  जसं आमचा शेरू (बोका) अगदी थोरल्या मुलासारखा माझ्या हालचाली वर लक्ष ठेवायचा तसच लेकानेही सुरू केलं. आधी आपण शेरूचा अनुभव ऐकुया.  शेरु म्हणायला फक्त बोका होता. पण बाकी सगळं वागणं अगदी घरातल्या मोठ्या माणसासारख.  रोज तिन्ही सांजेला दिवा लावला की रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे झालच पाहिजे असा त्याचा नियम होता. आता कुणी म्हणेल त्याला काय कळत होतं? पण त्याला कळायचं. ही दोन्ही स्तोत्रं आणि अजून काही स्तोत्रं खंड न पडता ऐकता यावीत म्हणून एका वापरात नसलेल्या फोनमध्ये सेव्ह करून मी ठेवली होती. तो फोन जिथे ठेवलेला असायचा शेरा बरोबर ठराविक वेळी तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करायचा. आणि एकदा त्याला रिपीट मोडवर सगळ लावून दिलं की स्वतःच्या ठरलेल्या जागी बसून ऐकायचा.  अमावस्या, पौर्णिमा वगैरेच्या दिवशी ते दिवसभर आमच्या घरात हळू आवाजात दोन्ही स्तोत्रं सुरू असायची.  एक ,दोन वेळा हयगय केली तेंव्हा त्याला आणि इतर लेकरांना त्रास झाला. त्यानंतर मात्र माझी हिंमत

अध्यात्म म्हणजे काय ? भाग १

इमेज
#अध्यात्म_म्हणजे_काय_? भाग १ आपण लहानपणापासून काही विशिष्ट आणि ठराविक साच्यातूनच विचार करत आलो आहोत कारण आपल्याला तशीच सवय लागली आहे. आणि तस बघायला गेलं तर त्यात आपली चुक आहे अस काहीच नाही.  ओव्हरऑल  समरी काढली तर कॉमन पॉईंट हे निघतील - स्वतःच्या आत्म्यापर्यंत प्रवास - देवात किंवा त्या शक्तीत लीन होणे - स्वतःच्या आत्माच्या प्रगतीसाठी  - स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवणे - मृत्यू ला शांतपणे सामोरे जाणे - देवाकडे पोहोचण्याचा मार्ग पण हे सगळं घडून येण्याच्या मध्ये अनेक पायऱ्या आहेत.  त्या पायऱ्या गाळून अचानक शेवटच्या टप्प्यात नाही जाता येत.  त्या पायऱ्या कोणत्या?  * आपली स्वतःप्रति असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या  - हो स्वतः, मी , ह्या मी ला विसरून "त्या"च्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते आणि ते सहज शक्य ही नसते.  आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो कुठलीही एकच गोष्ट करण्यासाठी नाही. तर अनेक गोष्टी करत स्वतःची प्रगती करण्यासाठी.  मी ला विसरणे म्हणजे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गुणांकडे डोळेझाक करणे.  मी खरा कसा आहे? हे ज्याला कळले तोच आणि तोचच स्वतःच्या दुर्गुणांवर काम करू शकतो. 

मॉर्निंग मंत्रा भाग 2

इमेज
#मॉर्निंग_मंत्रा २ १ नोव्हेंबर २०२२ #थॉटस्_पॅटर्न  ह्या जगात कुठली गोष्ट सर्वात जास्त अवघड असेल तर ती म्हणजे स्वतःच्या बाबतीत चांगल घडत आहे, घडणार आहे असा विचार करणे.  जसा वाईट विचार , भावना, व्यक्ती ह्यांचा मनावर परिणाम पटकन होतो तसा तो चांगल्या विचार, भावना आणि व्यक्तींचा होत नाही अस का? कारण जी गोष्ट सोपी , कमी त्रासदायक ती लवकर स्विकारली जाते. जी गोष्ट करायला, स्वीकारायला अवघड तिला शक्यतो टाळण्याकडे माणसाचा कल असतो.  चांगल्या सवयी स्वतः ला लावणे, स्वतःमध्ये रुजवणे हे सगळ्यात अवघड काम. त्यातही एका स्पेसिफिक वयानंतर तर मी कुणाचं का ऐकावं? हा मला सांगणारा कोण? ही वृत्ती वाढलेली असते. त्यामुळे चांगल काही शिकायचं म्हटल की जास्त कष्ट करावे लागतात.  मी याआधीही म्हणाले होते की अध्यात्मातच नाही तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात प्रगती हवी असेल तर आधी बेसिकवर काम करा.  स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करायचा प्रयत्न करा.  ज्यांना अस वाटत की , अध्यात्म म्हणजे फक्त परमार्थ त्यांना एक सांगते , जोपर्यंत स्वार्थी होऊन तुम्ही स्वतःची प्रगती करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांची मदत करू शकत नाही.