पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नास्तिक

इमेज
नास्तिक  "गाडी का थांबवलीस रतन?" लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याच जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं.  पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे.  त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत.  आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत.  स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं.  वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते.  पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते.  काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्स मधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांना

मी आणि करुणात्रिपदी

इमेज
मी आणि करुणात्रिपदी मागच्या एका वर्षापूर्वी विश्वास कथेमधील काही भाग एकीने ढापला होता. नंतर मी ते फेसबुक वर शेअर केलं आणि त्यावर तिने काउंटर लेख लिहिला. तो वाचून माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तू तिने लिहिलेलं नीट वाच. तिने तुझ्या लेखनाचा अभ्यास तुझ्यापेक्षा जास्त केला आहे. तुला तुझ्या देवाकडून संकेत आहे त्यात. मी शांतपणे ते लिहिलेलं वाचलं. आणि जाणवलं की काय मिस केलं मी. त्यात तिने लिहिलं होतं की दत्त गुरूंना ही म्हणजे मी गौरी हर्षल काय स्वतःची प्रॉपर्टी समजते का? तेंव्हा मी ते खूप हलक्यात घेतलं होतं. पण आज मला त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे. का? अरे नकळत का होईना तिच्यामुळे मला हे जाणवलं की माझा मित्र , माझा दत्त माझ्या आयुष्यात लेखनात किती भिनलेला आहे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात खूप काही छान घडवून गेला. माझं दत्ताशी नातं इतकं घट्ट झालं की आता काही मागण्याची गरजच पडत नाही. दत्त माझी प्रॉपर्टी नाहीये पण माझ्या सगळ्या जन्मांच्या पाप-पुण्याच्या प्रॉपर्टीचा हिशोब प्रत्यक्ष त्याने आपल्या हातात घेतला आहे. बास अजून काय पाहिजे. वाईटातून चांगलं घडतं म्हणतात ते असं... पुढे करु

प्लेलिस्ट भाग 1 - गौरी हर्षल

इमेज
प्लेलिस्ट भाग 1  छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से सारी वादी भर गयी ना जाने क्यों, दिल भर गया ना जाने क्यों, आँख भर गयी कानात हेडफोन आणि बसच्या खिडकीमधून बाहेर दूर कुठेतरी नभापलीकडे रेंगाळलेली नजर... ती तिच्याच विश्वात दंग... काय विचार करत असेल ती?  ह्या विचारात संपणारा बाकीच्या प्रवाशांचा रोजचा प्रवास... मुळात ती अशीच होती आपल्यात रमलेली.  जगाचं भान राखाव अस काही नव्हतच जगाकडे ... स्वतःशीच संवाद साधत ती तो प्रवास  भरभरून एन्जॉय करत राहायची.  इतर कुणी आपल्याला बघत आहे,  हे तिच्या खिजगणतीतही नसायचं.  ती आपली तिच्या वेगाने तिचं घर ते क्लिनिक, अन् क्लिनिक ते घर हा प्रवास तिच्या प्लेलिस्ट सोबत करायची.  रोज वेगळी प्लेलिस्ट रोजच्या मुडशी जोडलेली.  आज तर प्लेलिस्ट मधले आवडते सोबती बरोबर होते म्हणजे कारण ही खास होतं.  छोटी सी कहानी से... पासून सुरू झालेली प्लेलिस्ट विचारांच्या सोबत वाऱ्याशी गप्पा मारत होती.  नकळतच ओल्या होणाऱ्या डोळ्यांच्या कडांवर एखादा चुकार थेंब रेंगाळत होता. त्याला ही तसच स्वीकारत ती ओठांवर मात्र हसू खेळवत होती.  मनात हळूहळू भूतकाळाच्या तुकड्यातून पझल पूर्ण होत होते. एके

one day at a time - 3-365 days of self care

इमेज
"आई, मी येतेय ह्या वीकेंडला. आणि माझा प्रोग्रॅम फिक्स आहे बरं का! आधी मी शॉपिंगसाठी जाणार आहे, तिथून एक बुक लॉन्च आहे, त्या नंतर वैदू सोबत लंच आणि मग दुपारी चारच्या आसपास घरी येणार. अँड देन....", शची नॉनस्टॉप बोलत होती.  "अग हो , हो थांब, जरा श्वास घे. ", तिला थांबवत रीमा म्हणजे तिची आई म्हणाली, " तू घरी येणार आहेस की तुझ्या पी ए ला तुझ्या अपॉइंटमेंट सांगत आहेस? ", रीमाने थोडं रागातच विचारलं.  "उप्स, साॅरी आई , एक्ससाईटमेंट मध्ये मीच बोलत राहिले. बट आय प्रॉमिस संध्याकाळ नंतर कुठेच जाणार नाहीये. घरीच असेन तुझ्या आणि बाबासोबत. ", शचीच्या आवाजात तिला तिची चूक कळली आहे हे जाणवत होतं.  "ओके , ठीक आहे, बघू. संध्याकाळी तरी किती वेळ तुझा पाय घरात टिकतो ते. ", रीमा हसतच म्हणाली.  दोघी मायलेकींनी संभाषण आवरतं घेत फोन ठेवला.  ठरल्याप्रमाणे शची शनिवारी सकाळीच लवकर घरी आली.  घरात पाऊल टाकत नाही तोच तिच्या बॉसचा फोन आला. आणि त्यावर बोलतच तिने नाश्ता केला. आवरून आईबाबांच्या गळ्यात पडून सॉरी म्हणतच तिने घर सोडलं.  मग पुढचा भरगच्च कार्यक्रम पार पाडत वैद

learn from experience...2-365 days of self care

इमेज
"आर्यन, झालं की नाही तुझं आवरून? उशीर होत आहे आपल्याला.", असं म्हणतच शिला आर्यनच्या खोलीत आल्या. आर्यन खिडकीजवळ बसून टेबलवर असलेल्या त्या फोटोंकडे एकटक बघत होता. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याची अवस्था बघून शिलाला सुद्धा भरून आलं. आणि चार वर्षांपूर्वीचा आर्यन समोर उभा राहिला. पडलेले खांदे, रडवेला चेहरा आणि कोलमडून गेलेलं मन अशा अवस्थेतच आर्यन पीजी मधून घरी आला होता. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शक्य ते प्रयत्न आर्यन करत होता. त्यासाठी तो वाट्टेल ते कष्टही घेत होता. पण एकामागे एक संकटांची मालिका सुरू झाली. आणि कुठेतरी आर्यनचा आत्मविश्वास डळमळीत झाला. शीला आणि रमेश मात्र ह्या काळात खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहिले. रमेशची त्याच्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी असूनही आर्यनने त्याला नकार दिला. नकार देताना आर्यनने त्या दोघांनाही सांगितलं की , "माझ्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर मला काही तरी करून दाखवायचे आहे. जर ह्या वेळीही  मला यश मिळालं नाही तर मी नक्की तुमची मदत घेईन. पण मला पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू द्या. " त्या दोघांनाही आ

feel it heal it...from 1-365 days of self care

इमेज
"मनीषा अजून किती दिवस धावणार आहेस तू या सगळ्या गोष्टींपासून? कधी ना कधीतरी तुला सगळ्या गोष्टींना फेस करावेच लागणार आहे. चार लोकांमध्ये जाऊन मिसळावे लागणार आहे. पुन्हा एकदा जॉब वर जावे लागणार आहे. पण तू आहेस की तुला फक्त घरात एका कोपऱ्यात बसून राहायचं आहे. असं केल्याने कसं चालेल मनीषा?" मनीषाची आई मनीषाला समजावण्यासाठी प्रयत्न करत होती. मनीषा वय वर्ष 30 च्या आसपास. असं काय घडलं होतं मनीषाच्या आयुष्यात? की ती सगळ्या गोष्टी सोडून घरात बसून रहात होती. मनीषाचं वय बघता तुम्हाला एक साधारण अंदाज आला असेल. तर मनीषा नुकतीच एका विचित्र नात्यातून सुटली होती. ओळखीने ती त्या व्यक्तीच्या आणि ती व्यक्ती तिच्या संपर्कात आले होते. बघता बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली तसं मात्र समोरची व्यक्ती टाळाटाळ करू लागली. मनीषा ने काही गोष्टी तिच्या मोठ्या बहिणीच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट बहिणीला सांगितली. बहिणीने तिच्या नवऱ्याच्या मदतीने त्या मुलाची चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की, त्याचं ऑलरेडी लग्न झालेल आहे. बायको गावाकडे असते आणि हा