पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज कुछ अच्छा पढते हैं

इमेज
#आज_कुछ_अच्छा_पढते_हैं  सकाळी उठल्यावर मनात चांगले विचार आणले तर दिवस चांगला जातो असं आपण ऐकत आलो आहोत.  पण खरंच असं होतं का? रोज कितीही ठरवलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, परिस्थितीचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो. मग अशा वेळेला काय करायचं?  असच एक ॲप चाळत असताना मला मॉर्निंग पेजेस ही संकल्पना सापडली. तशी ती बरीच जुनी आहे.  1992 च्याच आसपास julia कॅमेरॉन ह्या लेखिकेने the artist's way म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची बेसिक संकल्पना होती spiritual path to higher creativity.  असो तर मुख्यत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेला काय अपेक्षित होतं ते सांगते.  तिच्या म्हणण्यानुसार सकाळी कमीत कमी 20 मिनिटे स्वतःला देत 3 पानं तरी रोज लिहायची.  या लिहिण्याला कुठलेही बंधन नाही. मनात येतील ते चांगले, वाईट विचार कागदावर उतरविण्यास सुरुवात करायची. फक्त लिहायचं. लिहायचंच का? कारण लिहिताना आपल्याला विचार करण्यास पुरेसा वाव मिळतो. आपल्या विचारांना सुसूत्रतेने कागदावर लिहून काढण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक विचार करू लागतो. आपल्या भावना आणि विचार यांचा ताळमेळ आपोआपच जुळतो आणि मनातले विचार सु