पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

way out

इमेज
वे आऊट  जवळपास एक आठवडा होत आला अजूनही मला प्रीतीने फोन नाही केलाय. अनुष्का तिच्याच विचारात गुंतलेली होती. "प्रीती" तिची सगळ्यात जवळची मैत्रीण.  एकच शाळा, एकच कॉलेज आणि त्यानंतर नोकरी सुद्धा एकाच बिल्डिंगमध्ये पण वेगवेगळ्या ऑफिसमध्ये. ऑफिस जरी वेगवेगळे असले तरी जाता येता दोघे एकत्र असायच्या. त्यामुळे सातत्याने एकमेकींच्या आयुष्यात काय घडतंय हे एकमेकींसोबत शेअर करणं हे ओघाने आलच.  नवीन ऑफिस जॉईन केल्यानंतर हळूहळू अनुष्काला मात्र जाणवायला लागलं की प्रीती तिला टाळण्याचा प्रयत्न करते.  कधी कधी प्रीती तिला सांगायची की मला बरं वाटत नाहीये आणि त्या दिवशी ती बाहेर फिरायला गेलेली असायची.  कधी दोघींचा प्लान करायचा आणि तो लास्ट मिनिटला ती कॅन्सल करायची.  या गोष्टी अनुष्काने तेवढ्या मनावर घेतल्या नाहीत.  पण नुकतंच जे काही तिने स्वतः बघितलं ते बघितल्यानंतर मात्र ती मनातून दुखावली गेली.  ज्या प्रीतीच्या वाढदिवसासाठी अनुष्का सरप्राईज प्लान करत होती. ती प्रीती अनुष्काला टाळून इतरांबरोबर तो वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅनिंग करत होती.  जर त्या दिवशी अनुष्का हॉटेलमध्ये प्रीतीच्या मागच्याच टेबल वर

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...

इमेज
आपण सगळेच जण आपल्या जवळच्या लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. कधी कधी तर अनोळखी लोकांना सुद्धा आपण न मागता मदत करण्यास तयार होतो.  अशावेळी आपण त्यांना ते सगळे उपाय सांगत असतो जे आपल्याला उपयोगी पडलेले असतात. पण ते उपाय स्विकारण्याची त्यांची तयारी आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपल्याला असा ठाम विश्वास असतो की जे पुस्तकं किंवा औषध, किंवा एखादं मोटिव्हेशनल भाषण जसं आपल्या मनाला, शरीराला उभारी देण्यासाठी उपयोगी पडले तेच त्यांनाही तशीच सकारात्मक ऊर्जा देईल.  पण आपण हे विसरतो की, आपण ज्या फेजमध्ये आहोत किंवा होतो त्याच फेजमध्ये समोरची व्यक्ती नाहीये.  त्यामुळे अर्थातच हे उपाय कितीही प्रभावी असले तरीही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची ते स्विकारण्याची मानसिक तयारी नसते तोपर्यंत त्यांचा काहीही उपयोग होत नाही.  म्हणूनच मदत करताना ती समोरच्या व्यक्तीवर लादली जात नाही ना हे लक्षात घ्यावं.  त्रास शारीरिक असो किंवा मानसिक प्रत्येक व्यक्तीची त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा महत्वाची असते नेहमीच.  स्वतःला शोधताना - गौरी हर्षल मानसशास्त्रतज्ञ  

कौन्सेलिंग बेसिक ..

इमेज
Don't judge a book by its cover... अतिशय साधं वाक्य पण आपण मात्र कुणाला भेटल्यानंतर हीच गोष्ट करत असताॆ ना?  पहिल्या भेटीत व्यक्ती कशी आहे हे कधीच कळत नाही. त्यामुळे कुणाबद्दलही कुठलेही अडाखे बांधू नयेत हे खरं तर बऱ्याचदा सांगितलं जातं.  कारण पहिल्या भेटीत शिष्ट, माणूसघाणी वाटणारी व्यक्ती पुढे जाऊन कदाचित तशी नसू शकते...  आणि तुमच्याशी प्रचंड मोकळेपणाने वागणारी, खूपच आपलेपणा दाखवणारी व्यक्ती आतल्या गाठीचीही असू शकते...  सगळी माणसं सातत्याने मुखवटे घालूनच वावरत असतात.  हे मुखवटे कोणासमोरही उतरत नाहीत.  प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कोण कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे कोणालाही माहीत नसतं.  असो तर मुद्दा हा आहे.....  जेव्हा एखाद्या व्यक्तीला समुपदेशनाच्या क्षेत्रात कार्य करायचे असते, तेव्हा तिला तटस्थपणे इतरांचे निरीक्षण करणे जमायला हवे.  कुठल्याही व्यक्ती बद्दल कमेंट्स पास करणं, गॉसिपिंग करणे या गोष्टी टाळता येणे जमायला हवं.  जर या गोष्टी जमत नसतील तर त्या शिकायलाच हव्या.... तर आणि तरच तुम्ही समोर येणाऱ्या क्लायंटचे समुपदेशन उत्तम प्रकारे करू शकता. कौन्सेलिंग बेसिक ...  #स्वतःला_शोधताना #गौ

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव

इमेज
कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव कालाय तस्मै नमः ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे असा उल्लेख त्यामध्ये मी केला होता.  कालाय तस्मै नमः मधील सगळ्यात महत्वाच्या पात्रांपैकी एक पात्र म्हणजे अरुंधती श्रीपाद कुलकर्णी, कैवल्य ची आई.  ज्यांनी ही कथा प्रतीलिपीवर किंवा पुस्तकाच्या माध्यमातून ( shopizen ॲप वरून मागवता येईल) वाचली आहे त्यांना त्या पात्राबद्दल माहीत आहे.  नवीन वाचकांसाठी थोडक्यात सांगते ,  कालाय तस्मै नमः ही गोष्ट आहे कुलकर्णी कुटुंबाची... ह्या कुटुंबातील थोरल्या सुनेवर अरुंधतीवर घरातील कुणीतरी अमानवीय शक्तींसोबतच विषप्रयोग करत आहे... पण अरुंधतीला मिळाली आहे दैवी शक्तींची देणगी... तिच्या जीवाशी खेळण्याचा परिणाम होतो सगळ्या कुटुंबावर .... अरुंधतीचा अकाली मृत्यू कुटुंबाला देतो मुलगी जन्माला न येण्याची शिक्षा..... पण मग अचानक काही वर्षांनी घरात एक मुलगी जन्माला येते आणि ती जगते .... तिच्या जन्माला येण्यामागे काही रहस्य आहे की अरुंधतीने घेतला आहे पुनर्जन्म?  अरुंधतीच्या मृत्यूला जबाबदार असणारे पुन्हा एकदा प्रयत्न करतील का? त्या नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाला संपवण्याचा...  वर