पोस्ट्स

#inspiring लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Quote of the day 8

इमेज
#Quote_of_the_day8 घरी खूप मस्का मारल्यावर नेहाला हव्या त्या डान्सच्या कोर्सला बाबांनी एडमिशन घेऊ दिली होती. कारण तिचं रेग्युलर कॉलेज क्लासेस ह्या सगळ्यात खूप कमी वेळ तिच्याकडे उरत असे. तिला नाही म्हणण्यामागे तिचीच दमणूक होऊ नये असा त्यांचा विचार होता. पण नेहाच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. उत्साहाने क्लास सुरू झाला होता. बडबड्या स्वभावाने तिने इथेही भरपूर मैत्रिणी जमवल्या. ह्या सगळ्यात एक जण होती स्मिता. नेहा आल्यापासून सगळ्या तिच्याभोवती असतात हे ती सुद्धा बघत होती. द्वेष किंवा इर्षेने नाही तर कुतूहलाने कारण स्मिताला अस मोकळं बोलणं वागणं जमतच नसे का कुणास ठाऊक पण ती शांत शांतच असायची. घरीही सगळे तिला समजावत की अग हेच वय आहे मजा मस्ती करण्याचं पण स्मिता आपली स्वतःच्याच विश्वात असे. नेहा मात्र इतरांच्या सोबत स्मितालाही आपल्या मस्तीमध्ये घेत असे. हळूहळू स्मितालाही स्वतःहून ओळख करून घेणं, बोलणं जमू लागलं.  अशातच एके दिवशी क्लासमध्ये लवकरच मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी तयारी सुरू झाली.  सगळ्याच जणी उत्साहात होत्या. फ्युजन प्रकार निवडून काहीतरी नवीन सादर करावं अस

Quote of the day 7

इमेज
Quote of the day 7 ऋतुजा 4 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफीसला आली होती. ती आली तसे सगळेच तिच्या आसपास गोळा झाले. कशी झाली ट्रिप वगैरे विचारू लागले. ऋतुजा अगदी मनमोकळी वागणारी आतलं बाहेरचं अस काही नसायचं तिचं त्यामुळे भरपूर मित्रमंडळी जमवलेली. आजही तेच झालं होतं ती आली तसे सगळे बोलण्यासाठी धावले. गर्दीच्या मागे कुणीतरी तिला बघत होते. तिचंही बोलता बोलता त्या व्यक्तीकडे लक्ष गेले. तो चेहरा बघताच ऋतुजाचा चेहरा पडला. कोण होती ती व्यक्ती??? ती होती नयन ऋतुजाची कॉलेजमधली मैत्रीण. ऋतुजा आणि नीरजा ही बेस्ट फ्रेंडची जोडी कॉलेजमध्ये फेमस होती. सगळ्या गोष्टी करताना दोघी सोबत अभ्यासातही आणि मस्ती करताना सुद्धा. अशातच सेकंड इयरला नयनची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली नवीनच असल्याने ती फारशी कुणामध्ये मिसळत नव्हती. मग हळूहळू तिची ऋतुजा, निरजाशी ओळख झाली. त्याही ती एकटी पडू नये म्हणून मदत करायच्या. पण नयनला मात्र त्यांची मैत्री खटकू लागली होती. कारण तिला असं जिवाभावाचे कुणीच नव्हतं. नयन सतत त्या दोघींचं निरीक्षण करत असायची.काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ऋतुजा बॅलन्सड आहे पण नीरजा मात्र जरा भोळसट आणि पटकन विश्वास

Quote of the day 6

इमेज
#Quote_of_the_day6 सारिकाच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्या निमित्ताने घरातच पूजा आणि छोटंसं गेट टुगेदर करावं असं तिने आणि तिच्या नवऱ्याने सचिन ने ठरवलं. त्यानुसार एक छान सोयीचा मुहूर्त निवडत तयारी सुरू झाली. हवापालट म्हणून गावी  गेलेल्या माई आणि आबांना आणण्यासाठी गाडीही दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे ठरले. माई आबा म्हणजे सचिनचे आईवडील. गावी सचिनचा भाऊ सुरेश त्याची पत्नी  सुनीता आणि मुलगा राहत होते. गावी राहणं हा त्या दोघांचा निर्णय होता कारण तिथे राहून काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यात सुनीतालाही तिथलं वातावरण आवडल्याने तिने तिथंच राहू अस ठरवलं. त्या हेतूने गावाकडच्या घरातही सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या गेल्या. सचिन आणि सुरेशला एक बहीण ही होती सपना तिचं लग्न जवळच्या गावातच झालं होतं पण ते नवराबायको नोकरीनिमित्त वेगळ्या शहरात होते आणि सासुसासरे गावी असायचे.  असा आपापल्या विश्वात रमलेल्या तरीही जिवलगांचा हा गोतावळा सुखी होता.  गेट टूगेदरच्या निमित्ताने सगळेच सचिन-सारिका कडे जमले होते.  ह्या सगळ्यात अजून एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. ती म्हणजे सपनाची जाऊ

Quote of the day 5

इमेज
#Quote_of_the_day5 रचना एक खूप चुणचुणीत चटकन कुणाच्याही नजरेत येईल अशी गोड मुलगी. धाकटी असल्याने सगळ्यांची आवडती. जितकी घरच्यासमोर साधी तितकीच बाहेर त्या उलट असे. पण स्वतःच्या मर्यादा तिने आखून घेतलेल्या असल्याने घरचे कधीही तिला कशासाठी अडवत नव्हते. नुकतंच तिने शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता नव्यानेच नोकरीही हातात आली होती. सुरुवातीचे दिवस असल्याने घरून एक दोन महिने पगार हवा तसा वापरायची तिला परवानगी होती. मग काय मस्त मज्जा करणं सुरू होतं. पण त्यातही ती घरच्यांना विसरली नव्हती पहिल्या पगारात सगळ्यांना आवडतील असे सरप्राईज दिले होते तिने ह्या कृतीमुळे आईबाबांना आपल्या मुलीबद्दल असलेली खात्री अजूनच पक्की झाली होती. मित्रही भरपूर होते तसे तिला पण घरचं वातावरण मोकळं असल्याने घरी सर्व माहिती असे. हल्लीच मात्र मित्रमंडळी मध्ये एक नवीन चेहरा सतत दिसू लागला होता. तो होता समीर रचनाचा कलीग समवयस्क असल्याने तो त्यांच्या ग्रुपमध्ये कधी मिसळला कुणाला कळलंच नाही. हळूहळू रचना आणि समीरची फक्त मैत्री नसून पुढे काहीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. तसे आडून आडून सगळे छेडतही असत. पण अजून त्या दोघांन

Quote of the day 4

इमेज
#Quote_of_the_day4 मैथिली एका छोट्या सोसायटी मध्ये राहत होती. पंचकोनी कुटुंब सासुसासरे, मैथिली ,तिचा नवरा अमेय आणि मुलगी इरा. नणंद त्याच गावात पण तिच्या सासरी होती. ओव्हर ऑल बाहेरून बघताना एक छान हसतखेळत जगणार कुटुंब. ह्या जागी 2bhk फ्लॅट घेऊन नव्यानेच ते शिफ्ट झाले होते. हळूहळू तिथलं वातावरण , शेजार ह्यांच्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवराबायको दोघेही काळाची गरज असल्याने नोकरी करणारे त्यामुळे ओघाने मुलीची थोडीशी जबाबदारी आजीआजोबांवर यायची. घरोघरी मातीच्या चुली ह्या नियमाला हे घरही अपवाद नव्हतं पण अमेयच्या वडिलांची शिकवण होती जे काही वाद असतील ते घरातच मिटवायचे. बाहेरच्या कुणालाही त्याची पुसट कल्पना सुध्दा नको. त्यामुळे फारसे विकोपाला जाणारे वाद होत नसतं. आता हल्ली टीव्हीवर असणाऱ्या सासुसुनांची कृपा की लोकांना कुठेही आसपास हसून खेळून राहणारी जोडी दिसली की ते डोकावतात. हे सगळं इतकं छान कसं???असाच प्रकार ह्या कुटुंबाबाबतही होऊ लागला. शेजारच्या पाटील काकूंना जरा जास्तच कुतुहल होतं की सून घरी नसते तर सासू काहीच चिडचिड का करत नाही? मग आपल्या रिकाम्या डोक्याचा काय उपयोग असा विचा

Quote of the day 3

इमेज
#Quote_of_the_day3 हवीहवीशी_तुलना शीर्षक जरा विचित्रच आहे न? गोष्टही अशीच आहे विचित्र पण सगळ्यांच्या ओळखीची. गोष्ट म्हणण्यापेक्षा किस्से म्हणूयात. किस्से आपले, आपल्या मनात लपलेले. आपण आपल्या दिसण्यापासून ते वागणं , बोलणं, खाणं पिणं सगळ्याच बाबतीत जास्त जागरूक असतो. कुठे एखादी आकर्षक व्यक्ती दिसली की नकळतपणे आपण स्वतःची तुलना तिच्याशी करू लागतो. कधी कधी ह्या तुलनेमुळे स्वतःला त्रासही होतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काही लोक तर अस कुणी भेटलं तर त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी नको तेवढे बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात करतात. ह्या सगळ्या धावपळीत आपण खरे कसे आहोत हेच विसरतात.  फेसबुकमुळे एक गोष्ट चांगली होते ती म्हणजे आपल्याच जुन्या आठवणी बघून आपण किती घडलो आहोत हे कळतं. तसे आपण बदलतच असतो अगदी दररोज. पण अट्टहासाने दुसऱ्यासारखं होण्यासाठी केलेले बदल कुठेतरी मनाला पटत नसतात. जी खूप जवळची आणि जेन्युईन लोकं असतात ती आडून आडून आपल्याला हे सुचवतात सुद्धा पण डोळ्यावर पट्टी असते न. आरशात बघताना नकळतच हे आपल्याला जाणवतं सुद्धा की आपण हे नाही आहोत पण मान्य कोण करणार??? असो तुलना

Quote of the day 2

इमेज
#Quote_of_the_day2 प्रतिक्षा आणि तिच्या जिवलग मैत्रिणीचं दिक्षा च एकत्रच पण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. प्रतिक्षाला नव्याने मार्केटमध्ये आलेल्या एका ठिकाणी नोकरी मिळाली तर दिक्षाच मात्र एका मोठ्या कम्पनीत सिलेक्शन झालं. पगार दोघींना जवळपास सारखाच होता पण प्रतीक्षा मात्र नाराज झाली. अर्थातच कारण योग्य होत तिच्या दृष्टीने. हळूहळू दोघीही कामाच्या ठिकाणी रुळू लागल्या. दीक्षा जिथे होती तिथे कामाचे स्वरूप आणि नियम ठराविक होते आणि ते तसेच असावे असासुध्दा नियम होता. त्याउलट प्रतिक्षाच्या कंपनीत मात्र नवनवीन प्रयोग , कल्पना मांडणे , चर्चा करणे व्हायचे. कामाची पद्धत प्रतिक्षाला  सुरुवातीला कळतच नसे. कारण वर्षानुवर्षे आजूबाजूला सगळ्यांना एका साच्यातच काम करताना बघितलं होतं. पण जसजसा वेळ गेला तिलाही वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तो ठामपणे मांडणं जमू लागलं. खरं तर सिलेक्शन च्या वेळी ग्रुप डिस्कशन मध्ये  तिला हिरीरीने बोलताना बघूनच तिचं सिलेक्शन झालं होतं. इथे फक्त एकच केलं जातं होत की एखाद्या महिन्याचा वेळ प्रत्येक एम्प्लॉयीला न सांगता दिला जात असे. ह्या महिन्यात ती व्यक्ती काम कस क