पोस्ट्स

#inspiring #motivatinal लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Quote of the day 14

इमेज
#Quote of the day 14 निकिता आणि निखिलचं अरेंज मॅरेज. निकिताच्या माहेरी जशी जॉइंट फॅमिली होती तशी निखीलकडे नव्हती. निखिलच्या घरात तो , त्याचे आईबाबा आणि बहीण एवढेच लोक. बाकी नातेवाईक येऊन जाऊन असत पण ते कधीतरी  निमित्तापुरते. त्यामुळे घरातील व्यवस्था आईच्या हातात होती. आणि इतक्या वर्षांची एकटीने सगळं करण्याची सवय त्यांनाही लागली होती. त्यात सुनेच्या येण्याने बदल होणार हे जरी गृहीत धरले होते तरी तसा अनुभव दोघींचाही पहिलाच असणार होता. इतर घरात जस होत असे तस त्यांच्या घरातही होई भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच.  निकिताला मिळून मिसळून गोष्टी कराव्या वाटत तर सासूबाई ची एक पद्धत ठरली होती त्यांना ते तस हवं असे. ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण निखिल आणि त्याचे बाबा करत होते. पण सोल्युशन काय काढावं त्यांना समजेना. वयानुसार आईही नमतं घ्यायला तयार नाही मग शेवटी निखिलने वेगळं व्हायचं ठरवलं. त्याच सोसायटीमध्ये पण दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट होता तो आणि निकिता तिथे राहू लागले. हळूहळू गाडी रुळावर आली. दोघीही आपल्या आवडीच्या कामात मन रमवू लागल्या. आई आणि निकिता दोघींनाही चूक कळली होती. पण आ

Quote of the day 10

इमेज
#Quote_of_the_day10 सकाळी सकाळीच डॉ. पटेलांचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव बघितल्यावर त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं. पण फोन उचलून ते म्हणाले, बोल रे गाढवा आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी आली तुला?? इतक्या प्रेमाने डॉ कुणाशी बोलत आहेत हे त्यांच्या सौभाग्यवतीना लगेच कळालं. डॉक्टर त्यांचा जिवलग मित्राशी म्हणजेच मि. नाईकांशी बोलत होते. दोघे अगदी जीवश्चकंठश्च मित्र शाळेपासूनचे मधल्या काळात फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग मुळे एकमेकांपासून दूर होते. ते कामाच्या ठिकाणामुळे पुन्हा एकदा एकत्र आले. त्यात योगायोगाने बायकाही मैत्रिणी निघाल्याने त्यांची मैत्री मैत्री न राहता अगदी एकच कुटुंब असल्यासारखी झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या मैत्रीचा 50वा वाढदिवस साजरा केला होता. असो तर विषय हा की नाईकांनी पटेलांना जे की एक psychiatrist आहेत त्यांना सकाळी सकाळी फोन का केला???  समोरून नाईक बोलू लागले , मला तुझी अपॉइंटमेंट हवी आहे रे? पटेलांना अजूनच विचित्र वाटलं अरे हो देतो की पण कशासाठी आणि कुणासाठी??  ते आपण भेटलो की बोलू न,इति नाईक. ठीक आहे , तुला शक्य असेल तर उद्या सकाळी 11 वाजता ये क्लिनिकमध्ये किंवा घरीच