पोस्ट्स

#inspiring #motivation लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Quote of the day 16

इमेज
#Quote_of_the_day16 स्टेजवर मुलीचा सत्कार करण्यात येत होता. पण रजनीचे डोळे मात्र सतत भरून येत होते. कारणही तसंच होत रजनी आणि  तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते. इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेसवुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्णपदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते. ह्या सगळ्यात जर कुणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास.  रजनीच्या नवऱ्याने अगदी मोक्याच्या क्षणी तिची आणि मुलांची साथ सोडून दिली होती ते ही नको त्या लोकांवर विश्वास ठेवून. तिने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. नोकरी होती म्हणून रजनीला तशी काही आर्थिक काळजी नव्हती. पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली. तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही  दिवस  तिला ब्रेक घ्यायला लावला. मुलं शाळेत गेली की रजनी तासनतास रडत असे. अशीच एके दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली. रजनीला बघताच तिला अंदाज आला की ती काय करत होती.  तिने तिच्या ओळखीच्या ए