पोस्ट्स

#inspiring #motivational लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Quote of the day 17

इमेज
#Quote_of_the_day17 अमेय अगदीच शांत मुलगा. नाही म्हणायला ओळखीच्या लोकांमध्ये थोडा फार मिसळत असे पण बाकी अगदीच अबोल. अभ्यासात मात्र बऱ्यापैकी हुशार. त्यामुळेच तर कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालं आणि चांगली नोकरीही मिळाली. एकूणच काय निवांत आयुष्य चाललं होतं त्याचं. थोडया वर्षात लग्नाचं वय झालं म्हणून आईवडिलांनी मुली बघायला सुरुवात केली. अबोल असणाऱ्या अमेयला मात्र अत्यंत बडबड्या सखीने पसंत केले. हो तिनेच पसंत केले कारण हा पठ्ठया मुलगी कशी वाटली विचारलं की नुसता लाजत असे. मग शेवटी तिनेच होकार कळवला. योग्य मुहूर्त बघून लग्नही झालं.      अमेयच्या अबोल स्वभावाशी सखी जुळवून घेत होती. पण तिच्या येण्याने त्याच्या आईबाबांना मात्र घर भरल्यासारखं वाटत होतं. सतत तिची चिवचिव , वावरणं त्यांना आवडलं होतं. आवडलं तर अमेयला पण होत पण बोलणार कोण? असो असा त्यांचा संसार छान सुरू होता. वर्ष होत आल होत त्यातच नवीन पाहुण्याची चाहूल लागली.  सगळेच आनंदले. विचारले तरच बोलणारा अमेय आता मात्र हळूहळू बोलू लागला होता, सखीची जास्त काळजी घेत होता. बाळाशी गप्पा मारत होता. त्याच्यातले बदल सगळ्यांनाच सुखावणारे होते. आता सखी

Quote of the day 15

इमेज
#Quote of the day 15 यश आणि जय दोघे सख्खे भाऊ. यश थोरला तर जय धाकटा. यश जरा अभ्यासू त्यातच जास्त रमणारा अगदी आदर्श टाईप. त्याउलट जयला मात्र शेंडेफळ असल्याने सगळं काही स्वतःला आवडेल तेच करायला आवडत असे. जय लहान असल्यापासून जरा आईच्या मागेच जास्त वेळ असायचा. त्यामुळे त्याला स्वयंपाकाची गोडी कधी लागली त्यालाही कळालं नाही. आधी अगदी इमर्जन्सी किंवा फारच मूड आला तर एखादा पदार्थ करणारा जय हळूहळू जास्त रस घेऊन सगळं बघत असे. आईने आपल्या टिपिकल स्वभावधर्माला धरून विरोध केला पण थोडासाच. मुलांनी स्वयंपाक करू नये वगैरे काही तिचे विचार नव्हते पण जयने काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटायचं. जसं चार लोक यशच कौतुक करतात जयच सुद्धा करावं अशी तिची इच्छा होती.        जयच्या आवडीला गृहीत धरून आईबाबा आणि यश नेहमीच त्याला प्रोत्साहन देत. पण जयला अजून स्वतःबद्दल तेवढा विश्वास वाटत नव्हता. ह्यावर उपाय म्हणून यश सतत त्याला नवनवीन प्रयोग करायला लावत असे. अभ्यासात फारशी गती नसल्याने हॉटेल मॅनेजमेंट करणं शक्यच नव्हतं. पण म्हणून जे कौशल्य आहे ते का वाया घालवायचे? मग बाहेरून ग्रॅज्युएशन करता करता यशच्या मदतीने जय वेगव

Quote of the day 13

इमेज
#Quote_of_the_day13 रिद्धी आणि सिद्धी दोघी जुळ्या बहिणी. स्वभाव सोडले तर दिसणं, वागणं, बोलणं सगळं तंतोतंत सारखं होतं दोघींचं. रिद्धी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून कुढत बसे तर सिद्धी मात्र अगदी उलट होती नाही पटलं तर स्पष्ट नकार देऊन आपला मुद्दा नीट पटवून देणार. नुकतंच दोघींचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. दोघींचे मार्ग तसे बारावी नंतरच वेगळे झाले होते. सिद्धीला कम्प्युटर मध्ये रस असल्याने तिने त्यात शिक्षण घेतलं तर रिद्धी होम सायन्स शिकली. कॉलेज तर पूर्ण झालं. आता पुढे शिकायचं की अजून काही प्लॅन आहे ह्यावर विचार करून ठेवा मग आपण बोलू अस त्यांचे बाबा सकाळी ऑफिसला जातानाच सांगून गेले होते.  पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं अस सिद्धीच ठरलं होतं. रिद्धीला मात्र कळत नव्हतं काय करावं. शेवटी तुला सगळ्यात जास्त काम कुठल्या फिल्डमध्ये करायला आवडेल त्यावर विचार करून मग ठरव अस सिद्धीने सुचविल्यावर तिला आपल्याला dietician व्हायला आवडेल अस जाणवलं. मग त्यात अजून काय करता येईल. त्यावर सर्च करून बरीच माहिती तिने मिळवली.  यथावकाश दोघींचे एडमिशन झाले त्या आपापल्या नवीन विश्वात रमू लागल्या. लहान लहान गोष्टी श

Quote of the day 12

इमेज
#Quote_of_the_day12 वैभव घरात मधला होता मोठा भाऊ होता आणि धाकटी बहीण. मोठा भाऊ पहिला म्हणून घरात प्रचंड लाडका तर बहीण एकुलती एक म्हणून. अशात वैभवकडे कधीतरी चुकून दुर्लक्ष होत असे. पण तो तसा समजूतदार होता. त्यामुळे ते आपल्या मनावर न घेता तो स्वतःच्या पायावर लवकर उभा राहिला. जिद्दीने शिक्षण ही पूर्ण केले. त्या उलट घरात इतर दोघांची अवस्था वेगळी होती. भाऊ अति लाडामुळे हट्टी बनला होता, एका नोकरीत फार काळ टिकत नसे. तर बहिणीला हुशार असूनही नटणे मुरडणे ह्यातून अभ्यासासाठी वेळ नव्हता. त्यामानाने वैभव लवकर सेटल झाल्याने घरीदारी सगळ्यांच्या तोंडी आता वैभव असे. त्याचे उदाहरण सतत इतरांना ऐकायला मिळत होते. जो मुलगा इतके दिवस कुणाला दिसतही नव्हता तोच आता प्रकाशझोतात होता. वैभव मात्र ह्या सगळ्याने हुरळून जाणाऱ्यातला नव्हता तो आपला स्वतःच्या विश्वात बिझी राहत असे. घरात पैसे देत असतानाच तो स्वतःसाठीही इन्व्हेस्टमेंट करत होता. काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले वैभवने स्वतःच्या सेविंगमधून मदत केली. वडिलांना त्याचा अभिमान वाटला पण त्यांनी बोलून दाखवल नाही. वैभवच्या तर अशा काही अपेक्षा नव्हत्याच त्यामुळे तो म

Quote of the day 11

इमेज
#Quote_of_the_day11 काही लोकांना विज्ञानातले नियम खऱ्या आयुष्यात ही वापरायचे असतात. म्हणजे ह्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया हवी असते. त्यांना अस वाटतं की न्यूटनच्या नियमाचा वापर जसाच्या तसा झाला पाहिजे 😂 कोणता नियम तोच तो, Every action has an equal and opposite reaction.  पण प्रत्येक जण असच वागेल अस नसत न. काही लोक असतात शांतताप्रिय माझ्यासारखी😜😜. अस अजिबातच नाहीये पण तरीही जेंव्हा कुणीतरी आपल्याला राग यावा म्हणून माकडचाळे करत असतात तेंव्हा शांत बसून गंमत बघण्यात जी मज्जा असते ना ती दुसऱ्या कशात नाही.            तर असाच एक किस्सा राजवी चा. राजवी आपलं काम भलं आपण भले ह्या कॅटेगरी मधील. तिला फारसं कुणाच्या खाजगी गोष्टीत,  कामात लक्ष घालणं आवडत नसे. पण हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात तसच एका ठिकाणी काम करणारी लोकही नसतात. राजवीच्या काही सहकारी होत्या ज्या नोकरी फक्त घरातून बाहेर पडणे ह्या एकाच हेतूने करत होत्या. त्यामुळे कामापेक्षा इतर भानगडीमध्ये जास्त लक्ष असणे साहजिकच होते. गॉसिप करणे मज्जा करणे आणि कधीतरी जमलं तर थोडस काम नाहीतर काम करणाऱ्या लोकांना त्रास देणे. अशा एका

Quote of the day 9

इमेज
#Quote_of_the_day9 रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजेच्या वेळी स्वतःहून पुढे येऊन मदत करणार मग ते करताना तिला कितीही त्रास झाला तरी तिची तक्रार नसे. चिडखोर नव्हती ती पण सतत येणाऱ्या अनुभवांनी तिची रिएक्ट करण्याची पद्धत तशी झाली होती. मूळ स्वभाव मात्र सहनशील आणि मदतीला तत्पर असा असल्याने तो उफाळून वर येईच. पण जेव्हा मदत घेतल्यानंतर लोक वळूनही बघत नसत ओळखही दाखवत नसत तेंव्हा तिला खूप मनस्ताप होऊ लागला. मदत करताना तिला तशी अपेक्षाही नसे पण लोक चक्क जेंव्हा ओळख नाकारत तेंव्हा वाईट वाटण स्वाभाविक होतं. जे काही जवळचे लोक होते ते तिला समजावत की तू जशास तशी वागत जा शब्दात, भावनांमध्ये अडकून वाहवत जात जाऊ नकोस. तिलाही ते पटत असे पण पुन्हा कुणी रडकुंडीला येऊन मदत मागितली की ती व्यक्ती मागच्या वेळी कशी वागली ह्याचा विसर पडून रजनी मदत करे.  हळूहळू मात्र जशी तिची चिडचिड जवळच्या लोकांना त्रासदायक होऊ लागली तेंव्हा तिचा मित्र रोहितने तिला समजवण्याचे ठरवले. कारण ह्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान रजनीचेच होत होते. झोकून